कर्दळीवन

कर्दळीवन

" कर्दळीवन प्रतिष्ठान " एक संकल्प, एक विचार, एक भावना आमचे प्रिय मित्र श्री.अमोल भोसले यांची.
कर्दळीवनाच्या पहिल्या प्रवासातून परतताना श्री.भोसले यांनी हा विचार व्यक्त केला की, आपण कर्दळीवनाचा प्रवास सर्वसामान्य तळागाळाच्या दत्त भक्तांसमोर मांडू शकतो. अनेक स्वामीभक्तांना कर्दळीवनाविषयी ऐकीव माहिती आहे, पण कर्दळीवन नक्की कुठे आहे, कस जायचं, प्रवास कसा आहे, याविषयी काहीही माहित नाही. दत्त संप्रदायातील ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला कर्दळीवनाची माहिती मिळावी, सुखकर प्रवास करता यावा, कमीत कमी खर्चात याठिकाणी जाता यावे या संकल्पापोती "कर्दळीवन प्रतिष्ठान " या संस्थेचा जन्म झाला.

गिरनार दर्शन