Skip to main content Skip to search

आवाहन

सर्व स्वामी भक्तांनी या गोष्टींची मुख्य नोंद घ्यावी 

श्रीशैल्य-कर्दळीवन-श्रीशैल्य अशी यात्रा करणाऱ्यांनी यात्रेच्या तारखेच्या आदल्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत श्रीशैल्य येथे हजर रहावे.

मर्यादित जागा आणि रेल्वे आरक्षण १२० दिवस अगोदर करणे बंधनकारक असल्यामुळे कृपया वेळेत नाव नोंदणी करावी.

 


या स्वामींच्या प्रकटस्थानाला आपल्यासारख्या स्वामी भक्तांकडून हानी पोहोचू नये यासाठी आणि या प्रवासात आपल्या अज्ञानामुळे स्वत:ला त्रास होऊ नये म्हणून पुढील गोष्टींची काळजी घ्यावी :

  • ज्या अनुभवी लोकांबरोबर आपण कर्दळीवनात आलो आहोत त्यांच्याबरोबर समूहाने राहणे, काही कारणास्तव अपरात्री बाहेर जाताना आपल्याबरोबर दोन-तीन लोक असावेत.

  • कर्दळीवनातील प्रत्येक वस्तू, पशू, कीटक, प्राणी, वृक्ष, वेली, फुले, मुंग्यांची वारुळे स्वामीस्वरूप समजून आपल्या कुठल्याही कृत्यामुळे त्यांना इजा पोहचणार नाही, नुकसान होणार नाही याची सतत काळजी घेणे आवश्यक आहे.

  • कर्दळीवनात आपण एक अध्यात्मिक ऊर्जा मिळावी म्हणून आलेलो असतो. ती मिळविण्यासाठी चालताना जप करणे, एका जागी शांत बसल्यावर अध्यात्मिक विषयावरील ग्रंथाचे वाचन करणे, ध्यान धारणा करणे, समूहामध्ये भजन-कीर्तन करणे वा ऐकणे या गोष्टी करू शकतो.

  • कर्दळीवनाचा प्रवास हा एक प्रकारचा अध्यात्मिक ‘वनवास’ आहे. या वनात आपण काही मोजक्या दिवसांसाठी आलेलो असतो. हे लक्षात घेऊन या दिवसात सांसारिक, कौटुंबिक, राजकीय, व्यावसायिक, आदी साऱ्या विचारांना दूर ठेवावे.

  • या पवित्र परिसरात प्लास्टिकचे कागद, बाटल्या, तेल व शॅम्पूच्या पुड्या टाकून प्रदूषण वाढवू नये. साबण, विविध प्रकारची तेले, तंबाखू, सिगारेट, पान-सुपारी, गुटखा, मद्य या पदार्थांना बंदी आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

  • या ठिकाणी कोणतीही सोय नाही. राहण्यासाठी आणि नैसर्गिक विधीसाठी भविष्यात काहीही सोय होईल असे वाटत नाही. एकमेकांचे भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक प्रत्येकाने लिहुन ठेवणे गरजेचे आहे.

  • नवीन ठिकाणी, धार्मिक ठिकाणी वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळणे महत्वाचे असते. प्रवासादरम्यान स्वभाव शांत ठेऊन तडजोड करणे व जी परिस्थिती असेल त्याचा आनंदाने स्विकार करणे महत्वाचे ठरते.

कर्दळीवन यात्रेमध्ये जाताना बरोबर घेण्याच्या वस्तू  :

१.  गोळ्या व औषधे

२. ओळखपत्र

३. बॅटरी

४. गुहेत वापरता येथील अशा चपला ( स्लिपर्स )

५. मेणबत्ती, काडेपेटी माचिस किंवा लायटर

६. ओडोमास / Mosquito repellent

७. ग्लुकोज बिस्किटे

८. स्वत:साठी पाण्याची बाटली जी परत निघतानाही जवळ ठेवायची आहे

९. पूजेचे साहित्य, वाचनासाठी ग्रंथ

१०. ताट-वाटी

११. वजनाने हलकी चादर

 गिरनार यात्रेमध्ये मध्ये जाताना बरोबर घेण्याच्या वस्तू:

१. गोळ्या व औषधे

२. ओळखपत्र

३. बॅटरी

४. थंडीचे गरम कपडे

५. ओडोमास / Mosquito repellent

६. ग्लुकोज बिस्किटे

७. पूजेचे साहित्य, वाचनासाठी ग्रंथ

अधिक माहितीसाठी मुख्यपानावर  यात्रांचे फॉर्म दिले आहेत.

×
Get Callback ?