Skip to main content Skip to search

About us

ll  श्रीराम ll

ll श्री गुरुदेव दत्त ll श्री स्वामी समर्थ ll

लाभले भाग्य आम्हास l या कलीयुगात ll

घडली कर्दळीवन यात्रा l या कलीयुगात ll

 

 

“कर्दळीवन प्रतिष्ठान” एक संकल्प, एक विचार, एक भावना आमचे प्रिय मित्र श्री.अमोल भोसले यांची.

कर्दळीवनाच्या पहिल्या प्रवासातून परतताना श्री.भोसले यांनी हा विचार व्यक्त केला की, आपण कर्दळीवनाचा प्रवास सर्वसामान्य तळागाळाच्या दत्त भक्तांसमोर मांडू शकतो. अनेक स्वामीभक्तांना कर्दळीवनाविषयी ऐकीव माहिती आहे, पण कर्दळीवन नक्की कुठे आहे?  कस जायचं? प्रवास कसा आहे? याविषयी काहीही माहित नाही. दत्त संप्रदायातील ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला कर्दळीवनाची माहिती मिळावी, सुखकर प्रवास करता यावा,कमीत कमी खर्चात याठिकाणी जाता यावे या संकल्पापोटी  “कर्दळीवन प्रतिष्ठान” या संस्थेचा जन्म झाला.

आमच्या वाचनात बरेचवेळा असे आले, की स्वामींची आणि दत्तमहाराजांची इच्छा असल्याशिवाय आपण कर्दळीवनात जाऊ शकत नाही. पण आम्हाला असे वाटले कि,कर्दळीवनात जाण्यासाठी आपली तीव्र इच्छाशक्ती, स्वामींची ओढ आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद पुरेसा आहे. आपण दोन पावले पुढे सरकलो, तर स्वामी नक्कीच दहा पावले पुढे येतील, असे अगदी मनापासून वाटते. असो……. स्वामी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेतच. त्यामुळेच त्यांच्या आशीर्वादाने सर्व भक्तांना कर्दळीवन यात्रा आमच्या हातून घडो हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना …!

गेली १७  वर्षे दर गुरुवारी नारायणपूरला जात असताना मनात निर्माण झालेली सामाजिक सेवेची भावना मागील ८ वर्षे मैत्री युवा प्रतिष्ठानच्या रुपाने चालू आहे. दत्त महाराजांच्या आणि प. पु. सदगुरु नारायण महाराजांच्या कृपाशिर्वादाने समाजातील गरजु लोकांपर्यंत पोहचण्याचा अविरत प्रयत्न आम्ही करत आहोत. तसेच कर्दळीवन आणि गिरनार पर्वत अशा धार्मिक ठिकाणी सहलींचे नियोजन करीत असुन या उपक्रमात अधिकाधिक भक्तांचा सहभाग अपेक्षित आहे.

मैत्री युवा प्रतिष्ठान
संस्थापक अध्यक्ष
श्री. अमोल भोसले

 मैत्री युवा प्रतिष्ठानचे आयोजित केलेले सर्व सामाजिक उपक्रम. :- फेसबुक 

×
Get Callback ?