Skip to main content Skip to search

Girnar(गिरनार)

f6d686f43266c3e167e23a70f47b2dbf

त्रिगुणात्मक् त्रिमुर्ति दत्त हा जाणा त्रिगुणि अवतार त्रैलॊक्यराणा
नेति नेति शब्द यॆ अनुमानासुर्वर् मुनिजन् यॊगि समाधि यॆ ध्यान

श्रीदत्त संप्रदायातील तीन परिक्रमा म्हणजे नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा आणि श्रीदत्त परिक्रमा या होय.

द्वारका, बेटद्वारका, नागनाथ, सोमनाथ, गिरनार

भौगोलिक माहिती

गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर ३,५०० फूट (१,११७ मी.) आहे. गुजरात राज्याच्या जुनागढ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे.त्यात अंबामाता, गोरखनाथ, औघड़ शिखर, गुरू दत्तात्रेय आणि कालका हे प्रमुख आहेत.त्यातील सर्वोच्च पर्वत गोरखनाथ  त्याची उंची ३,६६६  फुट आहे. हिंदू आणि जैन धर्मियांसाठी हे एक महत्वपूर्ण आणि पवित्र स्थान मानले जाते. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते

धार्मिक महत्त्व

सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे.

यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात.

गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयाचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. नवपरिणीत दांपत्यास देवीच्या पायांवर घालण्यासाठी येथे आणण्याची प्रथा आहे. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरुशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. जैनांचा बाविसावा तीर्थंकर नेमिनाथ याचे निर्वाण गिरनारवर झाले. नेमिनाथ शिखरावर त्याचे भव्य व संपन्न देवालय आहे. पालिताण्याजवळील शत्रुंजयाची यात्रा गिरनार चढून गेल्याशिवाय पुरी होत नाही, या समजामुळे गिरनारच्या यात्रेकरूंत जैन बहुसंख्य असतात. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे.

जुनागढपासून आठ कि.मी. अंतरावरील गिरनारला जाण्यास वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात.हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरु गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. दत्तस्थानापर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायऱ्यांची चढ-उतार करावी लागते.

k p

×
Get Callback ?