Skip to main content Skip to search

कडगंजी

श्री क्षेत्र कडगंची(गुलबर्गा,कर्नाटक)-वेदतुल्य अशा गुरुचरित्र ग्रंथाचे लेखन कडगंची येथे झाले.हे स्थान प्रसिध्दीस नव्हते.परंतु आता श्री सायंदेव दत्त देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे. गाणगापूरपासून ३४ किमी.अंतरावर हे पुण्य स्थान आहे.सायंदेव साखरे हा श्री नृसिंह सरस्वतींचा प्रिय व श्रेष्ठ भक्त होता.त्याच्याच ५व्या पिढीत सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला.श्री सिध्द मुनींनी सांगीतले आणि सरस्वती गंगाधर यांनी लिहीले तोच गुरुचरित्र ग्रंथ होय.गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री सिध्दनामधारक संवादे असा उल्लेख आहे.त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर होय.सायंदेवाचे घराचे जागेवरच श्री सायंदेव दत्त देवस्थानचे मोठे बांधकाम चालू आहे.येथील श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहून मन थक्क होते.

×
Get Callback ?