Skip to main content Skip to search

कारंजा

कारंजा(दत्त)(वाशिम)महाराष्ट्र (GURUMANDIR KARANJA) -हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे.आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झाला तो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी) यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता.त्या वाड्यामधे आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते.हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्री नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे.इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत.श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आज्ञेनुसार (लिलादत्त) श्रीपत ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या मंदिराची १९३४ साली स्थापना केली.वाशीम,अमरावती,अकोला,यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कारंजा हे ६० किमी अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बससेवा आहे.मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशन वर उतरून बसमार्गाने ३० किमी अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते.इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे.

×
Get Callback ?